Pune Crime News | ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात युवकाची आत्महत्या

June 19, 2024

पुणे :  – Pune Crime News | पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या पराभवानंतर एका कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता एका मराठा आंदोलकाने (Maratha Reservation Andolan) आत्महत्या (Suicide Case) केल्याचे समोर आले आहे. प्रसाद देठे (Prasad Dethe) असे या तरुणाचे नाव आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (बुधवार) सकाळी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत देठे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे.

प्रसाद देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रातील व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’ याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही, असा उल्लेख केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकत होते.

अनेकवेळा देठे यांनी फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

जयोस्तु मराठा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.

जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.
मला माफ करा.

तुमचाच प्रसाद