पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात घरफोड्या अन लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांनी हैदोस घातला असून, विविध भागात तीन ठिकाणी पादचाऱ्यांना अडवून लुटण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. बंडगार्डन, वानवडी व कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक भीतिच्या छायेखाली वावरत आहेत. pune crime news looted pedestrians in bundgarden wanwadi and kondhwa area
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सोमनाथ कुलकर्णी (वय 19) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रोहित विजय शिंदे (वय 21) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पंधरा दिवसांपूर्वी ससून हॉस्पिटल समोरील रस्त्यावरून रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास पायी चालत घरी जात होते. त्यादरम्यान एकजण दुचाकीवर पाठीमागून आला. त्याने फिर्यादी यांना धक्का दिला व त्यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. फिर्यादी तरुण मात्र गाबी गेला होता. त्यामुळे त्याने लागलीच तक्रार दिली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Pune Crime News | पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीमधून लाखाचा गांजा जप्त
तसेच दुसरा प्रकार हा वानवडीत घडला असून, याबाबतनितीन कांतीलाल मोहिते (वय 35) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शादाब युसुफ अन्सारी (वय 19) फौय्याज शिराउद्दीन अंसारी (वय 21) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यदनगर येथील रेल्वे गेट जवळून जात होते. यावेळी दोघांनी त्याचे जवळचा 10 हजार रुपयांचा मोबाईल हिसकामारत चोरून नेला. तर एकाने त्यांच्या दिशेने दगडफेक करत त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. हा प्रकार घेताच त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार चार दिवसांपूर्वी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
तसेच कोंढव्यातील गोकुळनगर येथे तरुणीचा मकबाईल हिसकवला आहे. याबाबत साक्षी विकास लाड (वय 25) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी हे ऑफिस सुटल्यानंतर मित्राची वाट पाहत थांबल्या होत्या. यादरम्यान दुचाकूवर अज्ञात चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ येऊन त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेऊन गेला. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title : pune crime news looted pedestrians in bundgarden wanwadi and kondhwa area
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
LPG Connection | मोठी खुशखबर ! सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून घ्या कसा करावा लागेल अर्ज?