पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | सिगारेट (Cigarette) घेण्यासाठी आईने २० रुपये दिले नाही, म्हणून थोरल्या मुलाने लाकडी बाबुंने आपल्या आईच्या हाताचे मनगटावर जोरात मारुन त्यांचा हात फ्रॅक्चर केल्याचा प्रकार कोंढव्यात घडला.
याबाबत सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव राजाराम कांबळे Madhav Rajaram Kamble (वय २७) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असताना त्यांचा मोठा मुलगा माधव कांबळे
याने त्यांच्याकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले. त्यांनी न दिल्याने त्याने आरडाओरडा केला.
तेव्हा फिर्यादी यांचा लहान मुलगा शंकर याने त्याला बाहेर जा , असे सांगितले. तेव्हा माधव हा बाहेरुन लाकडी बांबु घेऊन आला. त्याने फिर्यादी यांच्या हाताचे मनगटावर जोरात मारला. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Kondhwa Police Station – Mother’s hand fractured for not paying Rs 20 for cigarettes
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – वसतीगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या तथाकथित समाजसेवकाला अटक
- Retired ACP Milind Gaikwad | ‘लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचारनिर्मुलन आणि भारतीय संविधान’ या विषयावरील कार्यशाळेला चांगला प्रतिसाद ! सेवानिवृत्त एसीपी मिलिंद गायकवाड म्हणाले – ‘लाचखोरीची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी प्रयत्न गरजेचे’
- Vinayak Raut on CM Eknath Shinde | ‘हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…’, विनायक राऊतांचे शिंदेंना आव्हान
- Maharashtra Politics News | गरज पडल्यास 48 जागा स्वबळावर लढणार, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने आघाडीत खळबळ
- Ashish Shelar | ‘उद्धव ठाकरे आता विचारांनी काँग्रेसवासी होण्याच्या दिशेने…’, आशिष शेलारांचा घणाघात
- MLA Sunil Raut | ‘…तर संजय राऊत साडेतीन महिने तरुंगात गेले नसते’, नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला सुनील राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर