Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – कॉलेजचा मित्र घरी सोडायला आल्याने दुसर्‍या मित्राने केला विनयभंग; आक्षेपार्ह फोटो टाकून केली बदनामी

Pune Crime News | Kondhwa Police Station – College friend molested by another friend after coming to drop her home; Defamation done by posting offensive photos

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेला कॉलेजमधील मित्र मोटारसायकलवरुन घरी सोडायला आलेला पाहून दुसर्‍या मित्राचा जळफळाट झाला. त्याने महिलेला खाली बोलावून तिच्याशी अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation) केला. तसेच तिच्या मोबाईलमधील मित्राबरोबरचे आक्षेपार्ह फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पिसोळी येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२३/२३) दिली आहे. त्यानुसार संतोष मुनेश्वर (वय ४५) याच्यावर पोलिसांनी गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे. १८ मे रोजी रात्री ८ वाजता फिर्यादी
या कॉलेजमधील मित्राच्या गाडीवरुन घरी आल्या होत्या. हे पाहिल्यावर आरोपी संतोष मुनेश्वर याला राग आला.
त्याने फिर्यादीला खाली बोलावले. तिला शिवीगाळ करुन तिच्याशील अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला.
तिचा मोबाईल घेतला. त्यातील फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपवरुन फिर्यादीचा भाऊ व चुलत बहिणीचे पतीला फिर्यादी
आणि तिच्या कॉलेजमधील मित्राचे आक्षेपार्ह फोटो पाठवून बदनामी केली. पोलीस निरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title : Pune Crime News | Kondhwa Police Station – College friend molested by another friend after coming to drop her home; Defamation done by posting offensive photos