Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – पत्नीला घराबाहेर काढून तिच्या चेकवर बनावट सही करुन अपहार; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | कौटुंबिक कारणावरुन पत्नीला घराबाहेर काढल्यावर तिच्या घरात राहिलेल्या चेकबुकवर बनावट सही करुन त्याद्वारे खात्यातून ५ लाख ८५ हजार रुपये काढून फसवणुक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) पतीसह चौघांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पती प्रिन्स सतिश सधोत्रा (Prince Satish Sadhotra), सासू सोनिया सतिश सधोत्रा (Sonia Satish Sadhotra), सासरे सतिश कुमार सधोत्रा (Satish Kumar Sadhotra), दीर पारस सधोत्रा, (सर्व रा. न्याती इथोस, उंड्री) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार २७ ते २९ डिसेबर २०२१ दरम्यान घडला.
याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२०/२३) दिली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा पति प्रिन्स सधोत्रा यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद होत होता.
तेव्हा सर्वांनी मिळून कट करुन फिर्यादी यांना घराबाहेर काढले. त्यांना घराबाहेर काढतेवेळी त्यांचे बँकेचे चेकबुक
(Bank Check Book) घरातच राहिले होते. त्यातील चेकबुकचा वापर करुन त्यांनी फिर्यादी यांची बनावट सही
करुन त्यांच्या खात्यातून ५ लाख ८५ हजार रुपये काढून घेऊन फसवणुक (Fraud Case) केली.
हे पैसे त्यांनी सासु व सासरे यांच्या खात्यात वळते केले. याबाबत त्यांनी पतीला विचारणा केली असता त्यांनी
धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Kondhwa Police Station – Abduction of wife by taking her out of the house and forging signature on her cheque; A case has been registered against four including the husband
- Maharashtra Politics News | ‘आमचा 19 आकडा कायम राहील, पण…’, ठाकरे गटाने स्पष्टच सांगितलं
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून आंबेगावातील
सोसायटीमध्ये गुंडांचा धुडगुस; महिला जखमी
Sameer Wankhede | अतिक अहमदसारखं माझ्यासोबत घडू शकतं, समीर वानखेडेंनी केली ‘ही’ मागणी
Comments are closed.