पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरात अवैध गुटख्याची वाहतूक (Gutkha Distributors in Pune), विक्री आणि साठा करुन ठेवणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून (Pune Police News) कारवाई केली जात आहे. कोंढवा पोलिसांनी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या (Illegal Gutka Seller) दोघांना अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी एन.आय.बी.एम. रोडवरील पप्पू पान शॉप येथे छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख 73 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा (Pune Crime News) जप्त केला. (Gutkha Ban News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जीतलाल श्रीरामनंदन यादव (वय-39 रा. भोईटे चाळ, कोंढवा खुर्द मुळ रा. मुपो खानापूर ता. ग्यानपूर, जि. भदौरी उत्तर प्रदेश), अभिजीत शिवलिंग कटके (वय-25 रा. येवलेवाडी, कोंढवा खु.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) आयपीसी 328,272,273, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने कायदा तसेच अन्न व सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पुणे शहरामध्ये अवैधरित्या गुटख्याची विक्री (Sale of Gutkha) होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची वाहतूक व विक्री करण्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonawane) यांनी तपास पथकाला दिले होते. तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक जोतिबा पवार व विशाल मेमाने यांना माहिती मिळाली की, लोणकर नगर, एन.आय.बी.एम रोड, कोंढवा खुर्द येथील पप्पू पान शॉपमध्ये तंबाखुजन्य गुटखा विक्री केली जात आहे. पोलिसांनी पप्पू पान शॉप येथे छापा मारुन गुटखा विक्री करताना आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे केलेल्या चौकशीत सदर गुटखा साकीम उर्फ गुड्डु खान (रा. एच.एम. रॉयल सोसायटी, कोंढवा बु.) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती मिळाली. कोंढवा पोलीस गुड्डु खान याचा शोध घेत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार(CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(Jt CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Purnima Taware),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil),
पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, विशाल मेमाने, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले,
सुरज शुक्ला, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | Kondhwa police raid on Gutkha sellers, arrest two with Rs 5 lakh 73 thousand worth of goods; The search for the Gutkha supplier Sakim alias Guddu Khan is on
हे देखील वाचा :