पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर सुरीने वार केल्याची घटना पुणे (Pune Crime News) शहरातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. लग्नाची वरात पहात असताना आरोपीने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना (Pune Crime News) हवेली तालुक्यातील सांगरुन गावात शनिवारी (दि.12) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली.
रफिक इब्राहिम पानसरे (वय-50 रा. सांगरुन, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साहिल पानसरे (वय-21 रा. सांगरुन, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात रफिक पानसरे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
LIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, ‘ही’ योजना तुमच्या मुलाला बनवेल ‘लखपती’
दर्ग्याच्या देखभालीवरुन वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याचे वडिल सादिक पानसरे आणि रफिक पानसरे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सादिक आणि रफिक यांच्यामध्ये जुन्या दर्ग्याच्या देखभालीवरुन वाद आहेत. तसेच साहिल यांच्या बहणिला दोन वर्षापूर्वी रफिक याने शिवीगाळ केली होती. यावरून त्यांच्यातील वाद अधीकच वाढले होते.
Relationship Problems | प्रेमाचं नातं तोडण्यापुर्वी ‘या’ 7 गोष्टींचा नक्की विचार करा, जाणून घ्या
लग्नाची वरात पहाताना हल्ला
शनिवारी रात्री गावात लग्नाची वरात सुरु होती. सर्वजण तिथे थांबून वरात बघत उभे होते. त्याचवेळी रफिक हा हातात सुरा घेऊन आला. त्याने सादिक याला जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर आणि पाठीत भोसकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सादिक यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करित आहेत.
Web Titel : pune crime news knife attack young man watching wedding party attempt murder
केरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’
भाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची