पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मुळची रिक्षा निरा येथे असताना त्या रिक्षाची नंबर प्लेट लावून ती रिक्षा पुणे शहरात (Pune City) राजरोसपणे फिरत होती. वाहतूक शाखेने या रिक्षावर ई चलान फाडले. ते चलन मुळ रिक्षामालकाला पाठविले. त्यातून पुण्यात बनावट नंबर प्लेट (Fake Number Plate) लावून रिक्षा फिरत असल्याचे आढळून आले आहे. (Pune Crime News)
श्रीकांत मोहन वेळेकर Shrikant Mohan Velekar (वय ३६, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर – Mahatma Gandhi Colony, Shivajinagar) याला अटक केली आहे. याबाबत राजेंद्र चंद्रकांत बोराटे (वय ५०, रा. निरा) यांनी खडकी पोलीस स्टेशनमध्ये (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२३) दिली आहे. फिर्यादी हे निरा परिसरात रिक्षा व्यवसाय करतात. श्रीकांत वेळेकर याने रिक्षेवर बनावट नंबरप्लेट लावून व्यवसाय सुरु केला. २१ मे रोजी सकाळी अकरा वाजता तो खडकीतील पोल्ट्री चौकात (Poultry Chowk Khadki) आला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यावेळी त्याच्याकडे लायसन्स नव्हते तसेच विना गणवेश तो रिक्षा चालवत होता, म्हणून वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) त्यांच्या नंबरप्लेटवरुन त्याच्यावर ई चलनाचा १ हजार रुपयांचा दंड केला. त्याचा मेसेज फिर्यादी यांना गेला. तो पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी श्रीकांत वेळेकर याचा शोध घेऊन अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मगदुम तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Khadki Police Station – Arrested the driver of the rickshaw with fake number plate
- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमधील 6 बुक्कींना खराडी परिसरातून अटक ! IPL Cricket मॅचवर घेत होते Betting
- पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – पती, मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार; मंदिरात नेऊन केले लग्न
- पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – सराईत गुंडाच्या टोळक्याने दारू दुकानावर घातला दरोडा; दारुच्या बाटल्यासह नुकसान करुन गल्ल्यातील रोकड चोरली