Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – भाभी, मै तुम्हारे पैर दबाके देता हूँ म्हणत विनयभंग करणार्यास अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | घरात शिरुन भाभी मै तुम्हारे पैर दबा के देता हूँ असे म्हणत महिलेचा विनयभंग (Molestation) करणार्यास खडकी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.
रमजान मलंग शेख Ramadan Malang Shaikh (वय ३८, रा. पाटील इस्टेट) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार पाटील इस्टेटमध्ये १४ व १६ मे रोजी घडला होता. याबाबत एका ५१ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस स्टेशनमध्ये (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५९/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत.
फिर्यादी या घरी असताना रमजान शेख हा घरात शिरला. भाभी मै तुम्हारे पैर दबा के देता हूँ असे म्हणून त्यांचे
पाय दाबण्याचा प्रयत्न करण्याचा बहाणा करुन त्यांचा मॅक्सी वर करुन हात फिरवून लागला.
त्यांच्याशी गैरवर्तन करुन विनयभंग केला. त्यानंतर १६ मे रोजी पुन्हा घरात शिरुन घरातील चाकू घेऊन
त्यांच्यावर रोखला. त्यांना त्या दिवशी जे झाले ते कोणाला सांगू नको, नाही तर आजच तुला मारुन टाकतो,
अशी धमकी दिली. या प्रकाराने त्या घाबरुन गेल्या होत्या. त्यानंतर रविवारी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime News | Khadki Police Station – Arrested for molesting Bhabhi, Mai Tumhare Paar Dabake Dita Hoon
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – पत्नीला घराबाहेर काढून तिच्या चेकवर बनावट सही करुन अपहार; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
- Maharashtra Politics News | ‘आमचा 19 आकडा कायम राहील, पण…’, ठाकरे गटाने स्पष्टच सांगितलं
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून आंबेगावातील
सोसायटीमध्ये गुंडांचा धुडगुस; महिला जखमी - Sameer Wankhede | अतिक अहमदसारखं माझ्यासोबत घडू शकतं, समीर वानखेडेंनी केली ‘ही’ मागणी
Comments are closed.