Pune Crime News | चंदन चोरट्यांचे वाढते धाडस; एसआरपीएफ ग्रुपमध्ये जाऊन चंदनाचे झाड नेले चोरुन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शहरातील अत्यंत सुरक्षित आणि सुरक्षा व्यवस्था असलेल्या शासकीय कार्यालयांच्या आवारातील चंदनाची झाडे चोरुन नेणार्या चंदन चोरट्यांचे धाडस आता आणखी वाढले आहे. त्यांनी चक्क एस आर पी एफ ग्रुपच्या आवारात शिरुन चंदनाचे झाड चोरुन नेले. त्यामुळे आता इतर ठिकाणच्या चोरीचा तपास करताना पोलिसांना पोलिसांच्या आवारातील चोरीचा तपास करण्याची वेळ आली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. रजि. नं. ८४/२३) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील रामटेकडी परिसरात एस आर पी एफ ग्रुप १ व २ असे दोन बटालियन आहेत. या ठिकाणी कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश करता येत नाही. दरवाजावर २४ तास पोलिसांचा पहारा असतो. असे असतानाही एस आर पी एफ ग्रुप १ मधील बंगला परिसरातील लोटस पॉड येथे तीन ते चार चंदनचोर शिरले. त्यांनी तेथील चंदनाचे एक झाड कापून चोरुन नेले.
एन सी एल व इतर लष्कर व शासकीय कार्यालयाच्या आवारातील अनेक चंदनाची झाडे यापूर्वी चोरट्यांनी कापून चोरुन नेली आहेत.
Web Title :- Pune Crime News | Increasing courage of sandalwood thieves; Went to the SRPF group and stole a sandalwood tree
हे देखील वाचा :
Pune Crime News | अपघातानंतर पसार झालेला ट्रकचालक गजाआड; २५० सीसीटीव्ही तपासून लावला शोध
Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं
Latur ACB Trap | दहा हजाराची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता जाळ्यात
Comments are closed.