पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शहरात लुटमारीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, एका व्यक्तीला दोघांनी दगडाने आणि लोखंडी वस्तूने मारहाण (Beating) करून लुटल्याची घटना घडली आहे. लोणीकंद परिसरात हा प्रकार घडला आहे. Pune Crime News | In Lonikanda area, one was robbed by beating him with stones and an iron object
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी योगेश दत्तू धांडे (वय 38, मूळ रा. नगर) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार राजेश्वर उर्फ राधे रफिक राजपूत (वय 19 रा. मोशी) त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.
दरम्यान गेल्या महिन्यात ते पुण्यात आले होते.
त्यावेळी ते फुलगाव फाटा (Phulgaon Phata) ते आळदी रोडवरील चिंचवन हॉटेलजवळ रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास गाठले.
तसेच, त्यांना बेदम मारहाण करत डोक्यात दगड घालून 3 हजाराची रोकड आणि मोबाईल असा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वराळे हे करत आहेत.
दरम्यान त्यांना नेमकी कोणी मारले असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी पोलिसांची गस्त असते कुठे असेही प्रश्न या रात्रीच्या गुन्ह्यांमुळे उपस्थित होत आहेत.
Web Titel : Pune Crime News In Lonikanda area one was robbed by beating him with stones and an iron object
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच