पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | खडकी पोलिस स्टेशनच्या (Khadki Police Station) हद्दीतील बोपोडीतील (Bopodi) आदर्शनगरमधील महादेव घाट शंकर मंदिराजवळ युवकावर चौघांनी धारदार हत्यारे खुनी हल्ला (Attempt To Murder) केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून चौघांनी खुनी हल्ला केल्यानंतर हत्यारे हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. त्यांच्याविरूध्द खडकी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दिनेश उर्फ डीके कोठे Dinesh Alias DK Kothe (रा. सर्व्हे नं. 24, बोपोडी, पुणे), अजय उर्फ कावु पिल्ले Ajay alias Kavu Pille (रा. नाईक चाळ जवळ, बोपोडी, पुणे), अभिषेक उर्फ सोन्या मोरे Abhishek alias Sonya More (रा. बोपोडी गावठाण, पुणे) आणि
निखिल उर्फ चंग्या गायकवाड Nikhil alias Changya Gaikwad (रा. भामटी चाळ, बोपोडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनिष राजू पडियार Manish Raju Padiyar (21, रा. सर्व्हे नं. 26, भिमज्योत नगर, गणपती मंदिराजवळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मनिष हे घरातील पुजेचे साहित्य विसर्जन करण्याकरिता जात होते. त्यावेळी पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना तुला काय भाई बनायचे आहे का असे धमकावत शिवीगाळ केला. आरोपी अजय उर्फ कावु पिल्ले याने फिर्यादीस तुला जास्त माज आला आहे, तुझा आज गेमच करतो असे म्हणत हातातील ब्लेडने मनिषाच्या गळयावर वार केले (Attmept To Kill). आरोपी दिशेश उर्फ डीके कोठे याने लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या कानाच्या पाठीमागे वार केला. (Pune Crime News)
याला ठार मारून पाण्यात फेकुन द्या असे म्हणत आरोपी अभिषेक उर्फ सोन्या मोरे याने त्याच्याकडील हत्याराने मानेवर वार केले तर आरोपी निखील उर्फ चंग्या गायकवाड याने दगड फेकुन मारला. आरोपींनी फिर्यादी मनिष पडियार यांच्यावर खुनी हल्ला केला. आरोपींनी त्यांच्याकडील हत्यारे हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण केली. चौघांविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ (PSI Gunjal) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Hadapsar Police Station – 22nd MCOCA action by Commissioner of Police Ritesh Kumar against criminals in pune
हे देखील वाचा :