Pune Crime News | हडपसर : वाद जागेचा, अत्याचार महिलांवर; घरात शिरुन बलात्कार करणार्यांना अटक, कारखाना मालकही जेरबंद
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | हडपसर येथील शिंदे वस्तीतील जागेच्या मालकीवरुन असलेल्या वादातून दोन महिलांवर अत्याचार (Women Abuse) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बाबत दोन्ही बाजूकडील तिघा पुरुषांना अटक केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे वस्तीत कारखान्यात काम करणार्या महिलेचे पती रात्री ड्युटीवर गेले होते. त्यावेळी मालकाने कारखान्यात ऑर्डर आहे, असे खोटे सांगून तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर पतीला व मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकविणार असल्याचे खोटे सांगून फिर्यादीवर वेळोवेळी अत्याचार करुन मानसिक छळ केला. याप्रकरणी पोलिसांनी कारखाना मालकाला अटक केली आहे. (Pune Crime News)
दुसरी घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. ऑर्डर घेण्याच्या बहाण्याने दोघे जण घरात शिरले.
त्यांनी फिर्यादी महिलेवर आळीपाळीने बलात्कार (Rape Case) केला. याप्रकरणात पोलिसांनी किसन राकेश मिश्रा
Kisan Rakesh Mishra (वय २०) आणि लवकुश तिवारी (वय ३५) यांना अटक केली आहे.
या दोन्ही घटनांमध्ये मुळ वाद हा जागेवरुन असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. हडपसर पोलीस तपास करीत आहेत.
- विमान नगर : अल्पवयीन मुलींचा स्पोर्टस क्लासला विनयभंग करणार्या पीटी शिक्षकावर गुन्हा दाखल
- पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती
- पुणे शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या जळगाव मधील टोळीला पर्वती पोलिसांकडून अटक, 7 लाखांचा ऐवज जप्त
- तडीपार असताना घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक
Comments are closed.