Pune Crime News | पान टपरीचालकांच्या गल्ल्यात हात घालून लुबाडणारा गुंड जेरबंद ! पुणे स्टेशन पार्सल गेटजवळील घटना

February 4, 2025

पुणे : Pune Crime News | पान टपरीचालकाला लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी करुन गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेणाºया गुंडाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. (Arrest In Robbery Case)

आनस खान (वय २४, रा. चुडामण तालीम) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जुनैद निहाल खान (वय २४, रा. साईबाबनगर, शालीमार हिल पार्क, कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे स्टेशन पार्सल गेटजवळ ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुनैद खान यांची पान टपरी आहे. ते पान टपरीवर असताना आनस खान त्याच्या साथीदारांना घेऊन आला. त्याने फिर्यादीला लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी केले. पान टपरीच्या गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. परिसरात दहशत निर्माण केली. तसेच शेजारच्या टपरीवर जाऊन त्या टपरीच्या गल्ल्यातील जबरदस्तीने ५ हजार रुपये काढून घेऊन दुचाकीवरुन निघून गेले. जाताना का वॅगनर गाडीवर हातातील लोखंडी हत्याराने मारुन काचा फोडून गाडीचे नुकसान केले. बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.