Pune Crime News | बांधकाम व्यावसायात गुंतवणुक केल्यास चांगला परताव्याच्या आमिषाने केली फसवणुक; पैसे मागण्यास गेलेल्या तरुणाला मारहाण करुन केली जातीवाचक शिवीगाळ

पुणे : Pune Crime News |  आपला कंन्स्ट्रक्शन व्यवसाय असून त्यात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपये घेऊन फसवणुक केली. पैसे मागण्यास  गेलेल्या  तरुणाला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत बिबवेवाडी येथील एका ४३ वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मंगेश तुकाराम भगत Mangesh Tukaram Bhagat (रा. निवास संकुल, कात्रज कोंढवा रोड, कात्रज), त्यांची पत्नी व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज येथी शिवकैलास अमृततुल्य व आरोपीच्या घरी २६ मे २०२०५ ते ४ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश भगत याने आपला स्वत:चा  कंन्स्ट्रक्शन व्यवसाय असल्याचे फिर्यादीला सांगितले. बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविल्यास जादा फायदाचा परतावा देतो, असे आमिष दाखविले. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे १५ लाख रुपये गुंतविले. त्यांचे पैसे घेऊन त्यातीलच दीड लाख रुपयं त्यांना परताव्याच्या स्वरुपात परत केले. उर्वरित १३ लाख ५० हजार रुपये न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. फिर्यादी हे आरोपीच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले असताना त्यांच्या पत्नीने त्यांना जातीवाचक बोलत शिवीगाळ केली. फिर्यादी यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन गळ्यातून जबरदस्तीने हिसकावुन तोडून घेतली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे तपास करीत आहेत.