पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला जात असताना या उत्सवाला गालबोट लागले आहे. पुण्यातील मार्केट यार्डातील (Market Yard) आंबेडकरनगर येथे दोन गटात हाणामारी झाली. यानंतर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकरनगर परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक जण जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मंगळवारी दुपारी दोन गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
दोन्ही गटातील साथीदारांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. हाणामारीत पिस्तुलातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले.
Web Title : Pune Crime News | firing in ambedkarnagar in pune market yard area pune crime news
हे देखील वाचा :