पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मास्कचा आधार घेऊन पत्नीऐवजी भलत्याच महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात (Deputy Registrar Office) नेऊन पत्नीच्या नावे असणार्या प्रॉपर्टी (property) स्वतःच्या नावे करून घेतल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल (crime registered) केला आहे. शहरात हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले होते.
याप्रकरणी पती राहुल शिवाजीराव जाधव (वय 32), वकील प्रदीप बी. जाधव, पतीचा मित्र दीपक चव्हाण आणि एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कविता राहुल जाधव (वय 37) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (sahakar nagar police station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कविता या राहुल जाधव यांच्या पत्नी आहेत. दोघा पती पत्नीच्या नावाने आंबेगाव (ambegaon) येथील साई रेसिडेन्सी (sai residency pune) या इमारतीत तीन फ्लॅट होते. तसेच आंबेगाव परिसरात एक मिळकत या दोघांच्या नावे होती. मात्र, या प्रॉपर्टीचे सर्वाधिकार आपल्याकडे रहावे यासाठी राहुल जाधव याने इतर आरोपींना हाताशी धरून दुय्यम निबंधक कार्यालयात (Deputy Registrar Office) पत्नी ऐवजी एका दुसऱ्या महिलेला उभे केले. कधीही रद्द न होणारे बनावट दस्तऐवज (Forged documents) तयार करून घेतले.तसेच कुलमुखात्यारपत्राचा गैरवापर केला. या सर्वासाठी पती राहुल याने जी महिला उभा केली होती तिला मास्क घालून निबंधक कार्यालयात उभा केले होते. ती महिला फिर्यादी यांची पत्नीच असल्याचे भासवले होते. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी (sahakar nagar Police) गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस (sahakar nagar police) करत आहेत.
web title: Pune Crime News | FIR filed against four persons including husband and lawyer for taking another woman in the office of the Deputy Registrar instead of his wife.