Pune Crime News | हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्याविरोधात गुन्हा दाखल
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | हिंदू देवी, देवतांविषयी, महापुरुषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) करुन त्यांची बदनामी करणार्याविरोधात विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जगदीश काबरे (रा. सांगली) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
याबाबत सच्चित शामदत्त एरंडे (वय ३७, रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७३/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगदीश काबरे याने फेसबुक अकाऊंटवर जेट जगदीश, जगदीश काबरे, जे के या नावाने उघउलेल्या अकाऊंटवरुन हिंदु देवी देवतांविषयी, महापुरुषांविषयी, साधु संताविषयी आणि भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट (Facebook Offensive Posts) करुन त्यांची बदनामी केली. हिंदु धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे (Sr PI Vitthal Dabade) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Facebook account holder booked for posting objectionable content against Hindu gods, India
- पुणे शहरातील अट्टल महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 39 वी स्थानबध्दतेची कारवाई
- भाड्याने घेतलेल्या आलिशान कारचा अवैध धंद्यांसाठी राजस्थानात वापर
- 15 ऑगस्टला पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’
- वादातून एजंटांची प्रवाशांना मारहाण; तिघा एजंटावर गुन्हा दाखल, वाकडेवाडी एस टी स्टँडवरील घटना
- मैत्रिणीनेच घरातील दागिने नेले चोरुन; चेक देऊन केला बाऊन्स
Comments are closed.