Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन विक्रेत्याला फसविले; तुळशीबाग ते मंडई दरम्यानची घटना
पुणे : Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी (Pretending Policeman) करुन गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी बटव्यामध्ये ठेवण्यास सांगून तो बटवा डिकीत व्यवस्थित ठेवला आहे की नाही, हे पहाण्याचा बहाणा करुन चोरट्याने हातचलाखी करुन बटव्यातील ८० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. (Cheating Fraud Case)
याबाबत काळुराम बबन वाडकर (वय ५५, रा. भेकराईनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार तुळशीबाग ते मंडई (Tulshibaug To Mandai) दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडकर हे विक्रेते आहे. ते व्यवसाय करण्याच्या ठिकाणी गाडीतील विक्रीचा माल उतरवून थांबले होते. त्यावेळी एक जण आला व त्याने पोलीस असल्याची बतावणी केली. फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील सोन्याची अंगठी बटव्यामध्ये ठेवण्यास सांगितले. तो बटवा फिर्यादी यांच्या गाडीतील डिक्कीमध्ये ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी बटवा ठेवला असता त्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या आहेत का हे पाहण्याचा बहाणा करुन त्याने हातचलाखीने काढून घेऊन निघून गेला. काही वेळाने ८० हजार रुपयांच्या या वस्तूत डिकीत नसल्याचे वाडकर यांच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक नरवडे तपास करीत आहेत.