पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | भोर (Bhor Taluka News) येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगून ६० लाख रुपये घेऊन जमीन न देता फसवणूक (Cheating Case) केली. पैसे परत मागितल्यावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तालाच (Retired ACP) धमकावून आर्थिक नुकसान करण्याची भिती घालून आणखी ६ लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश अंकुश पोटे (Rajesh Ankush Pote), संदेश अंकुश पोटे (Sandesh Ankush Pote), प्रियांका निलेश सूर्यवंशी Priyanka Nilesh Suryavanshi (सर्व रा. कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक – Vadgaon Budruk, Pune) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१५ पासून सुरु होता. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पोटे, संदेश पोटे व प्रियांका सूर्यवंशी यांनी फिर्यादी यांचा
विश्वास संपादन करुन भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगितले.
त्यासाठी त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कोणती शेतजमीन खरेदी करुन दिली नाही.
त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्या भोसलेनगर येथील राहत्या घरी येऊन त्यांना पैसे देत नसल्याचे धमकावले.
आर्थिक नुकसान करण्याची भिती घातली.
ते सहायक पोलीस आयुक्त असताना मार्च २०२१ मध्ये आणखी ६ लाख रुपयांची खंडणी (Ransom) घेतली.
या पोलीस अधिकार्याने निवृत्त झाल्यानंतर आता याप्रकरणी तक्रार अर्ज दिला असून त्यानुसार फसवणूक
(Fraud Case) व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss
Sangli Accident News | भरधाव कार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू