Pune Crime News | 15 दिवसात 4 कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली 7 लाखांना गंडा

पुणे : Pune Crime News | व्यवसायासाठी १५ दिवसात ४ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो (Lure Of Bank Loan), असे आमिष दाखवून एकाने चार्जेसच्या नावाखाली ६ लाख ८२ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत किशोर पांडुरंग चौधरी (वय ६१ रा. चंद्ररंग स्काय सोसायटी, पिंपळेगुरव) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तन्मय रमेश जाधव Tanmay Ramesh Jadhav (रा. औदुंबर दर्शन सोसायटी, फातीमानगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हॉटेल शांताई येथे ५ एप्रिल २०२२ ते १ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तन्मय जाधव याने किशोर चौधरी यांचा विश्वास संपादन केला. त्यांना व्यंकटेश्वरा एंटरप्रायजेस मार्फत १५ दिवसात ४ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखविले. फिर्यादीसोबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. कर्जासाठी कराव्या लागणार्या कामासाठी त्यांच्याकडून चार्जेस म्हणून ६ लाख ८२ हजार रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत कर्ज मंजूर करुन देण्यास टाळाटाळ केली. १५ दिवसांत मिळणारे कर्ज दोन वर्षानंतरही न मिळाल्याने फिर्यादीयांनी वेळोवेळी घेतलेले पैसे परत मागितले. तेव्हा त्याने पैसे परत न करता फसवणूक केली. शेवटी चौधरी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक जे आर फडतरे (PSI J R Fadtare) तपास करीत आहेत.
Comments are closed.