पुणे : बहुजननामा ऑनलाईन – pune crime news | टिळक रस्त्यावरील एका लॅपटॉप विक्रेत्याला स्वस्तात लॅपटॉप घेऊन देण्याच्या आमिषाने 15 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गंडा घालणारा देखील लॅपटॉप विक्रेता आहे. मार्च ते जून 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. pune crime news cheating of 15 lakh of laptop seller on tilak road
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी केतन सुनील पळसकर (वय 36, नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भरत लिलेश कुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टिळक रस्त्यावर लॅपटॉप विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. तर भरत याचेही या परिसरात ऑफिस प्लस दुकान आहे. या दोघांची ओळख आहे. भरतने फिर्यादी यांना एकाचवेळी 100 लॅपटॉप खरेदी केले तर ते स्वस्तात मिळतील असे सांगत विश्वास संपादन केला. लॅपटॉप मुंबई येथून घेऊ असे सांगितले. फिर्यादी भरत याला ओळखत असल्याने फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांनी त्याला खरेदी करण्यास होकार दिला.
प्रथम 5 लाख व नंतर 10 लाख रुपये दिले. पैसे आरटीजीएसने दिले होते. पैसे दिल्यानंतर दोन दिवसात लॅपटॉप मिळतील असे, त्यांना सांगण्यात आले होते. मात्र पैसे देऊनही काही दिवस झाले तरी लॅपटॉप मिळाले नाहीत. एक ते दीड महिना झाल्यानंतर फिर्यादी यांनी त्याला विचारपूस केली असता तो टाळाटाळ करू लागला. तर नंतर त्याने फोन उचलणे देखील बंद केले. यामुळे फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. अधिक तपास उपनिरीक्षक सरडे हे करत आहेत.
Web Titel : pune crime news cheating of 15 lakh of laptop seller on tilak road
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update