Pune Crime News | कस्टमरला दाखवून आणतो असे सांगून कार डिलर घेऊन केला स्कोडा कार; वर्षभरानंतरही केली नाही परत, कारडिलरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News |   स्कोडा  कार विकत घेऊन तिची दुरुस्ती करुन आकर्षक बनविली. तेव्हा एका कारडिलरने कस्टमरला  गाडी दाखवून आणतो, असे सांगून स्कोडा कार घेऊन गेल. तो परत आलाच नाही. सव्वावर्षानंतरही कार परत न केल्याने वानवडी पोलिसांनी अपहार करुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत उमेर मोहम्मद रफी सय्यद (वय ३३, रा. अर्चना कोहिनुर ग्लोरी, महंमदवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उत्कर्ष मुकुंद साळवे (रा. राम सोसायटी, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महंमदवाडी येथील डील्स इन व्हील्स वर्कशॉप येथे एप्रिल २०२४ ते आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेर सय्यद यांचे डील्स इन व्हील्स हे वर्कशॉप आहे. त्यांनी इस्ज्राईल खान (रा. कौसरबाग) यांच्या मालकीची स्कोडा कार विकत घेतली. ती दरुस्त करुन चांगली बनवून वर्कशॉपला विक्रीसाठी ठेवली होती. कार डिलर उत्कर्ष साळवे याने या कारला कस्टमर असल्याचे सांगून कस्टमरला गाडी दाखवून आणतो, असे सांगून स्कोडा कार घेऊन गेला. त्यानंतर त्याने कार परत आणून दिली नाही. फिर्यादी यांनी अनेकदा मागणी करुनही त्याने कार परत करण्यास टाळाटाळ केली. कार डिलरने स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी कारचा अपहार करुन फिर्यादीची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक टोणे तपास करीत आहेत.