पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | फक्त शौक म्हणून महागडी दुचाकी गाडी चोरणाऱ्या (Bike Thief) आरोपीच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळल्या (Arrest) आहेत. त्याच्याकडून एफझेड (FZ) ही महागडी दुचाकी जप्त करुन दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई (Pune Crime News) लिपाणे वस्ती येथे करण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संदीप संपत आंधळे (वय-23 रा. विघ्नहर्ता सोसायटी, घुले नगर, मांजरी बु. मुळ रा. लिंबोरी ता. आष्टी, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलींग करत होते. त्यावेळी लिपाणे वस्ती येथे संदीप आंधळे याच्याकडे महागडी एफझेड (KA 38 EA 0406) आढळून आली. पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे दुचाकी बाबत चौकशी केली. चौकशी दरम्यान शौक म्हणून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता
(PSI Dhiraj Gupta), पोलीस अंमलदार चेतन गोरे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले,
सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजित जाधव,
धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Bharti University police arrested a man who stole an expensive bike as a hobby
हे देखील वाचा :