पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | तुम्हाला रुम भाड्याने द्यायची आहे. समोरची व्यक्ती रुम पाहण्याअगोदरच भाडे व डिपॉझिट ऑनलाईन देण्यास तयार असेल तर, सावधान, तो सायबर चोरटाही (Cyber Crime) असू शकतो. एका महिलेला सायबर चोरट्याने ९९ हजार ९९० रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत रास्ता पेठेत राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७४/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खराडी येथे रुम आहे. ती भाड्याने द्यायची आहे.
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी त्यांना एक फोन आला. तुमची रुम भाड्याने घेण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले.
ऑनलाईन डिपॉझिट पाठवित असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँकेची गोपनीय माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक (Fraud Case) केली. पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत. (Pune Crime News)
सध्या अनेक जण घर, रुम भाड्याने देत असतात. त्याच्या जाहिराती सोशल मीडियावर करत असतात.
त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे फसवित आहेत. तेव्हा घर, रुम न पाहता, प्रत्यक्ष न येता डिपॉझिट,
भाडे ऑनलाईन देण्यास कोणी तयार असेल तर सावध रहा. कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका,
असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Beware of renting a room; Fraud of a woman on the pretext of sending a deposit
हे देखील वाचा :
Prakash Mahajan | ‘हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे…’, प्रकाश महाजनांचा टोला