पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शेतावरुन पुरुषांमध्ये अगदी खूनापर्यंतच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पतीच्या निधनानंतर जाऊसह शेतजमीन कसणारा भावजयीच्या डोक्यात नंणदेने दगड घालून काठीने मारहाण (Beating) करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी मनिषा सुदाम वीरकर Manisha Sudam Veerkar (वय ४३, रा. वीरकर मळा, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७५/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुजाता सुरज सावंत Sujata Suraj Sawant (वय ५०, रा. कवडीपाठ, लोणी काळभोर – Loni Kalbhor, Pune) हिच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे १० वर्षापूर्वी निधन झाले असून त्या आपली आई, २ मुलांसह रहात असून आंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. त्यांच्या सासर्याची शेतजमीन असून ती फिर्यादी व तिची जाऊ मनिषा वीरकर या कसत आहे. सासरे त्यांच्या शेजारी एकटेच राहतात. दीड महिन्यांपूर्वी त्यांची नंणद सुजाता सावंत ही सासरे सोबत राहण्यास आली. तिला जमीन विकून टाकायची असे म्हणत असते.
शेतजमिनीच्या वाटपावरुन त्यांच्यात वादावादी होत असतात.
२७ डिसेबर रोजी फिर्यादी या शेतात हरभरा खुरपत असताना त्यांची नंणद पाठीमागून आली व तिने त्यांच्या
डोक्यात दगड घातला. त्या जमिनीवर पडल्यावर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
तुला माझ्या बापाची शेती फुकट पाहिजे काय?, थांब तुझा काटाच काढते, म्हणजे तुझा शेताचा विषयच खल्लास होऊन जाईल, असे म्हणून तिला मारहाण करुन गंभीर जखमी केले. तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्या तेथून पळून गेल्या. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Attempt To Murder Kill Case Loni Kalbhor Police Station
हे देखील वाचा :