Pune Crime News | ‘तुझ मुंडक काढून फुटबॉल खेळतो की नाही बघ’ ! हडपसर परिसरात गुंडाकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न

Pune Crime News | Attempt To Kill Murder Pune Hadapsar Police Station Crime News

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन गुंडाच्या टोळक्याने तरुणाला हॉकी स्टिकने मारहाण केली. ‘‘तुझ मुंडक काढून त्याने फुटबॉल खेळतो की नाही बघ’’ अशी धमकी देऊन कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा (Attempt To Kill) प्रयत्न केला. (Pune Crime News)

 

याप्रकरणी विजय अमृत सोनार (वय २०, रा. इंदिरानगर, वैदवाडी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६५९/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनोद बंदिछोडे (वय २४, रा. कामठेमळा, हडपसर) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार सिद्धु बंदिछोडे (वय २१, रा. पांढरेमळा, हडपसर – Hadapsar News) व इतर दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वैभव टॉकीजच्या मागे कामठे मळा येथील पुलाचे काम चालू असलेल्या ठिकाणी सोमवारी रात्री दहा वाजता घडला. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात चार दिवसांपूर्वी भांडणे झाली होती.
फिर्यादी व त्याचे मित्र राहुल मुळेकर, सचिन चांची असे बोलत जात होते.
त्यावेळी फिर्यादी हे लघवी करण्यासाठी बाजूला गेले होते. तेव्हा विनोद बंदिछोडे व त्याचे साथीदार तेथे आले.
त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीचे मित्र सोडवण्यास आले असताना त्यांना ही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांना हॉकी स्टिकने मारहाण केली.
विनोद बंदिछोडे याने कोयता काढून ‘‘तू परवाच्या दिवशी माझ्याकडून वाचलास आत्ता तुझ मुंडक काढून
त्याने फुटबॉल खेळतो की नाही बघ’’ असे बोलून कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा फिर्यादीने वार चुकवून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनोद बंदिछोडे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील
(PSI Patil) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Attempt To Kill Murder Pune Hadapsar Police Station Crime News

 

हे देखील वाचा :

State Bank of India (SBI) | आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळेल पेन्शन स्लिप आणि बॅलन्स डिटेल, जाणून घ्या कसे

Pune Crime | प्रियकराने विवाहास नकार दिल्याने 24 वर्षीय गर्भवती तरूणीची आत्महत्या; दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

Winter Session 2022 | मुंबई महापालिकेच्या रूग्णालय घोटाळ्यात अडकणार ठाकरे परिवारातील जवळचा व्यक्ती?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश…