पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – वय ८३, ७० आणि ६५ वर्षाच्या तिघा ज्येष्ठांवर कोणाचा संशयही येणार नाही. पण ते तिघे चक्क गांजाची तस्करी smuggling ganja करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्या ताब्यातून १ लाख ३० हजार ५५ रुपये किंमतीचा ४ किलो ६०३ ग्रॅम गांजा smuggling ganja हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप छबु शेलार यांनी भोसरी एमआयडीची पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसानी माणकाबाई शहाजी वाघमारे (वय ६५, रा. आंबेडकर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी), मामू ऊर्फ रऊफ खान रमजान खान (वय ८३, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी) आणि सावित्रीबाई युवराज गायकवाड (वय ७०, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी दुपारी लांडेवाडीतील आंबेडकरनगर झोपडपट्टी,
विठ्ठलनगर झोपडपट्टी, बालाजीनगर झोपडपट्टी या ठिकाणी छापा घालून या तिघांकडून ४ किलो ६०३ ग्रॅम गांजा Cannabis हस्तगत केला आहे. या ज्येष्ठांवर कोणाचा संशय येणार नाही, याचा गैरफायदा घेऊन ते गांजाची विक्री करीत होते. सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ अधिक तपास करीत आहेत.