Pune Crime News | दारु पिऊन कात्रजमधील दुकानात शिरुन वस्तू रोडवर फेकून देऊन गोंधळ माजवून खंडणी मागणार्या गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी दाखविला हिसका

पुणे : Pune Crime News | दारु पिऊन अल्पवयीन मुलाला बरोबर घेऊन किराणा दुकानात शिरुन गोंधळ घालून दुकानातील वस्तू रस्त्यावर फेकून दिल्या. महिलेकडे खंडणीची मागणी करुन डांगडिंग करणार्या गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी पोलिसांचा हिसका दाखविला.
प्रथमेश गणेश गुजर Prathamesh Ganesh Gujar (वय २०, रा. संतोषनगर, कात्रज) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याबरोबरच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रथमेश गुजर याच्यावर यापूर्वी सहकारनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.
याबाबत आशा कुसवाहा (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार संतोषनगरमधील नवभारत प्रोव्हिजन स्टेअरमध्ये गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश गुजर व एक अल्पवयीन मुलगा हे दोघे दारु पिऊन नवभारत प्रोव्हिजन स्टेअर या दुकानात आले. त्यांनी दुकानातील महिलेला खंडणी मागितली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा प्रथमेश गुजर याने त्यांना शिवीगाळ करुन हातातील हत्यार फिर्यादीवर उगारले.
त्यांच्या दोन्ही मुलांना ठार मारीन अशी धमकी दिली. दुकानाच्या काऊंटरवर ठेवलेल्या वस्तू दुकानासमोरील रोडवर फेकून देऊन नुकसान केले. प्रथमेश गुजर याचा हा धिंगाणा पाहून रोडवर पाहून लोक जमा झाले. तेव्हा लोकांकडे पाहून त्यांना तो म्हणाला, तूम्ही येथून निघून जावा, नाही तर तुम्हाला बघून घेतो. त्यामुळे लोक निघून गेली. याची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोंधळ घालणार्या प्रथमेश गुजर सह दोघांना ताब्यात घेतले.
गुजर याच्यावर आर्म अॅक्ट, खंडणी मागणे, सार्वजनिक शांतताभंग करणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर अधिक तपास करीत आहेत.