Pune Crime News | चोरट्याच्या मोडस ऑपरेंडीच्या अभ्यासावरुन मोबाईल चोरटा सापडला डेक्कन पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : Pune Crime News | आपटे रोडवर (Apte Road Pune) रात्रीच्या वेळी कॅब बुक करत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी ३० हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला, तरी रात्रीची वेळ असल्याने तो स्पष्ट दिसत नव्हता. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी झालेल्या मोबाईल चोरीच्या (Mobile Theft Case) घटनांमधून चोरट्याच्या चोरी करण्याच्या पद्धतीचा पोलिसांनी अभ्यास केला. त्यामुळे तो पुन्हा चोरी करण्यासाठी डेक्कन परिसरात येईल, असा पोलिसांना संशय होता. त्यानुसार या चोरट्याने प्रभात रोडवरील (Prabhat Road Pune) हॉटेल देहाती येथील घोडके चौकात एका व्यावसायिकाच्या हातातून मोबाईल हिसकाविला. हे समजताच डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Pune) सर्वत्र नाकाबंदी केली. चोरटा त्याला माहिती असलेल्या रोडवरील जाईल हे लक्षात घेऊन त्यांनी आपटे रोडवर पाळत ठेवली. चोरटा आल्याबरोबर पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून ४ मोबाईल हस्तगत केले आहेत.

हबीब अबालु इराणी Habib Abalu Irani (वय २४, रा. पाटील इस्टेट, वाकडेवाडी, मुळ मुंब्रा, ठाणे) असे या चोरट्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यात चोरलेल्या डेक्कन मधील दोन, बाणेर आणि येरवडा अशा चार ठिकाणचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

हबीब इराणी याने २१ जून रोजी रात्री पावणेदहा वाजता गौरव जयस्वाल हे आपटे रोडवरील हॉटेल रॅमी ग्रँड येथे फुटपाथवर उभे होते. ते मोबाईलवरुन कॅब बुक करीत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्याकडील मोबाईल चोरुन नेला होता.

त्यानंतर अमित संघवी हे १२ जानेवारी रात्री अकरा वाजता प्रभात रोडवरील हॉटेल देहाती समोरुन कॅब बुक करत असताना ८० हजार रुपयांचा मोबाईल मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेला होता. त्यानंतर काही वेळाने डेक्कन पोलिसांनी हबीब इराणी याला आपटे रोडवर पकडले.

हबीब इराणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी यवत पोलीस ठाणे, लोहमार्ग पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाणे, लोहमार्ग पुणे पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, पोलीस हवालदार धनश्री सुपेकर, हवालदार गभाले, महेश शिरसाठ, पोलीस अंमलदार सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, निलेश् सोनवणे, नागनाथ म्हस्के यांनी केली आहे.