पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News |गाडीचा कट मारल्यावरून एका तरुणाला बेदम मारहाण (Pune Crime) करत त्याच्या घरात शिरून टोळक्याने राडा घातल्याची घटना घडली आहे. कोंढवे-धावडे (kondhawe dhawade) भागात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी धीरज गणेश धावडे (वय 21), भूषण तानाजी धावडे (वय 28), कुणाल किरण धावडे (वय 22), संकेत तानाजी धावडे (वय 25) व चिराग भगवान धावडे (वय 19, रा. सर्व रा. सरगम सोसायटी, नांदेड सिटी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत वैशाली धावडे (वय 55) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) तक्रार (Pune Crime) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व एकाच भागातील आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी फिर्यादी यांचा मुलगा रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून येथील विष्णू नारायण कॉम्प्लेक्स समोरून जात होता. त्यावेळी धीरज धावडे याने कट मारल्यावरून वाद घातला. या दोघांचे भाडन सुरू असताना आरोपी एकत्र जमले व त्यांनी अभिजितला शिवीगाळ केली. त्यानंतर हातात कोयते आणि लाकडी स्टिक घेत फिर्यादी यांच्या प्लॉटचा संरक्षण दरवाजा तोडून मुख्य दरवाजातून आत प्रवेश करत कुटुंबाला शिवीगाळ करत मोठा धिंगाणा घातला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत या 5 जणांना अटक केली आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस (Uttamnagar Police) करत आहेत.
web title: Pune Crime News | A youth was beaten to death in Kondhve-Dhavade area and 5 persons were arrested by the police.
Maharashtra Cabinet Expansion | आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणार मंत्रिपद ?
Pune Crime | 4 एक्स-रे प्लेटस चोरणार्याला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
Pune Crime | कोथरूड परिसरात तडीपार गुंडानं तरूणावर वार करून 25 हजार लुटले, पोलिसांकडून अटक