पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | आपल्या 6 महिन्याच्या बाळाचा सहारा घेवुन मोबाईल चोरणार्या महिलेला समर्थ पोलिसांनी अटक केले आहे. तिच्याकडील 12 महागडे हॅन्डसेट जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
31 डिसेंबरच्या अनुषंगाने समर्थ पोलिस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लाणारे (API Prasad Lonare), महिला उपनिरीक्षक मिरा त्रंबके (WPSI Meera Trimbke), महिला पोलिस नाईक रूपाली काळे आणि तपास पथकातील पोलिस अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिला उपनिरीक्षे मिरा त्रंबके यांना एक मोबाईल चोर महिला आपल्या 6 महिन्याच्या बाळाचा सहारा घेवून चोर्या करीत असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक त्रंबके यांनी महिलेला तिच्या बाळासह ताब्यात घेवून तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी सुरूवातीला महिलेने उडवाउडवीची उत्तर दिली. तिच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर तिच्याकडे 12 महागडे मोबाईल हॅन्डसेट मिळुन आले. रेल्वेमध्ये प्रवास करताना व पुणे शहरात गर्दीचा फायदा घेवुन सदरील मोबाईल चोरल्याचे तिने सांगितले. (Pune Crime News)
सदरील महिला ही मुळची उत्तरप्रदेशातील असून सध्या तिचे वास्तव्य दिल्ली येथे आहे. दिल्लीवरून एखाद्या रेल्वेने प्रवास करत असताना ती चोर्या करीत होती. तिने पुणे शहरात देखील महिलांच्या पर्समधुन महागडे मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महिलेचे आणखी साथीदार असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत समर्थ पोलिस तिच्याकडे अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी महिलेकडून 1 लाख 40 हजार रूपये किंमतीचे 12 हॅन्डसेट जप्त केले आहेत.
उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पो.स्टे. चे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे (Sr. PI Ramesh Sathe),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे (PI Promod Waghmare)
यांच्या सुचनेनुसार तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रसाद लाणारे, महिला उपनिरीक्षक मिरा त्रंबके,
महिला पो.ना. रूपाली काळे, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे, रहिम शेख, कल्याण बोराडे, दत्तात्रय भोसले,
गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहिदास वाघीरे, सुभाष पिंगळे, श्याम सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | A woman who stole a mobile phone with the help of a 6-month-old baby was caught by the samarth police; 12 expensive handsets seized
हे देखील वाचा :
Jayant Patil | सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटील यांना पुन्हा दणका?
Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ट्रेडिशनल ड्रेस मधील हॉट फोटोजने चाहत्यांचे वेधले लक्ष