Pune Crime News | औंध परिसरात अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावाकडून हल्ला, 50 ते 60 हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडले

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) विनापरवाना दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (दि.7) औंध परिसरातील स्पायरस रोडवरील (Spicer Road, Pune) अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर दुकानदारांनी जमाव जमवून हल्ला (Attack) केला. यामध्ये जेसीबी चालक तसेच दोन अभियंते (Engineers) यांना मारहाण (Beating) करण्यात आली. याप्रकरणी दुकानदारांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime News) आला आहे.
मंगळवारी स्पायसर कॉलेज रस्ता येथील विनापरवाना दुकानांवर पुणे महानगरपालिकेचे पथक कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी दुकानदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून पथकावर हल्ला केला. यामध्ये जेसीबी चालक तसेच दोन अभियंते यांना मारहाण करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या पथकाने अशा परिस्थितीमध्येही 90 टक्के कारवाई करुन 50 ते 60 हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून मोकळे केले. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यानंतर या संदर्भात चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन (Chaturshringi Police Station)
येथे सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अज्ञात दुकानदानांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
यानंतरही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार असून यापुढे या दुकानदारांना तिथे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू दिला जाणार नाही
असा इशारा पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच पोलिसांनी दिला आहे.
पोलीस अधिकारी यांनीही दगडफेक आणि मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
Web Title :- Pune Crime News | A mob attacked the Municipal Corporation team that went for encroachment action in Aundh area, demolished a structure of 50 to 60 thousand square feet
हे देखील वाचा :
Comments are closed.