Pune Crime News | पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून अंमली पदार्थाचा (एल.एस.डी.) मोठा साठा जप्त ! 1 कोटी 14 लाखाचे 41 हजार 986 मिलीग्रॅम LSD हस्तगत
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. शहरातील रस्त्यावरुन आपल्याला फुडची डिलिव्हरी (Food Delivery App) रात्रीअपरात्री करण्यासाठी जाताना दिसतात. फुड डिलिव्हरी करत असल्याने त्यांच्याकडे कोणी संशयानेही पहात नाही. याचाच गैरफायदा घेऊन एका टोळक्याने अंमली पदार्थाची (Drugs) विक्री करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत त्याचे पार्सल पोहचविण्यासाठी चक्क डनजो ऑनलाईन डिलिव्हरी अॅपचा (Dunzo Delivery App) वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pune) पाच जणांना अटक केली आहे (Pune Crime News). दरम्यान, अटक आरोपींकडून आतापर्यंत तब्बल 1 कोटी 14 लाख रूपये किंमतीचे 41 हजार 986 मिलीग्रॅम एलएसडी जप्त करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रोहन दीपक गवई Rohan Deepak Gavai (वय २४, रा. डि पी रोड, कर्वे पुतळा, कोथरुड), सुशांत काशिनाथ गायकवाड Sushant Kashinath Gaikwad (वय ३६, रा. बाणेर, मुळ कोडोली, सातारा – Satara), धिरज दिपक लालवाणी Dhiraj Deepak Lalvani (वय २४, रा. पिंपळे सौदागर), दीपक लक्ष्मण गेहलोत Deepak Laxman Gehlot (वय २५, रा. सनसिटी रोड – SunCity Road Pune), ओंकार रमेश पाटील Omkar Ramesh Patil (वय २५, रा.वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी रोहन गवई, धिरज लालवाणी आणि ओंकार रमेश पाटील यांच्या ताब्यातून 51 लाख 60 हजार रूपये किंमतीचे एलएसडी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, ओंकार रमेश पाटील याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने त्याच्या अॅक्टीव्हा गाडीच्या डिक्कीत काही माल लपवुन ठेवला असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याच्या गाडीच्या डिक्कीतील 62 लाख 70 हजाराचे एलएसडी जप्त केले आहे.
पोलीस अंमलदार विशाल शिंदे (Police Vishal Shinde) यांना कोथरुड व परिसरात डनजो ऑनलाईन डिलिव्हरी अॅपद्वारे एल एस डी Lysergic acid diethylamide (LSD) या अंमली पदाथार्ची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रोहन गवई याला पकडून त्यांच्याकडून एल एस डी जप्त केले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे इतर साथीदारही असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्य चौघांना बाणेर (Baner), सिंहगड रोड (Sinhagad Road), पिंपळे सौदागर (Pimple Saudagar), वाकड (Wakad) परिसरातून अटक केली. (Pune Crime News)
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गवई हा एमबीएच्या शेवटच्या वर्षात (MBA Final Year) शिकत आहे. गायकवाड हा अभियंता असून त्यांचे इतर साथीदारही उच्च शिक्षित आहेत. पार्ट्यांचा नाद आणि शौक पुरविण्यासाठी पैसा मिळविण्यासाठी त्यांनी हा अंमली पदार्थ विक्रीचा धंदा सुरु केला. धीरज, दीपक आणि ओंकार हे तिघे यातील मास्टर माईंड असून इतर पेडलर आहेत. व्हॉटस अॅपद्वारे संपर्क (WhatsApp) साधल्यानंतर डिलिव्हरी देण्यासाठी ते फुड अॅपद्वारे ऑर्डर बुक करत असत. त्यानंतर समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करुन देत असत. या पार्सलमध्ये काय आहे, हे डिलिव्हरी बॉयला माहिती नसायचे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale)
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक
विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर
(API Shailaja Jankar), पोलिस अंमलदार विशाल शिंदे, पोलिस योगेश मोहिते, पोलिस मारूती पारधी,
पोलिस सुजित वाडेकर, पोलिस मनोजकुमार साळुंके, पोलिस पांडुरंग पवार, पोलिस ज्ञानेश्वर घोरपडे,
पोलिस प्रविण उत्तेकर, पोलिस विशाल दळवी, पोलिस संदिप शिर्के, पोलिस राहुल जोशी, पोलिस संदेश काकडे, पोलिस
नितेश जाधव, पोलिस सचिन माळवे आणि महिला पोलिस अंमलदार रेहाना शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title : Pune Crime News | A large stock of Narcotic Drug (LSD) seized from Pune Police Crime Branch! 41 thousand 986 milligrams of LSD worth 1 crore 14 lakh seized
हे देखील वाचा :
Pune Crime News | Wanawadi Police Station : पुणे – वानवडी पोलिसांकडून घरफोडी करणार्या दोघांना अटक
Comments are closed.