Pune Crime News | पुणे: गुन्हे शाखेतील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल ! 2 पोलिस, महिलेसह 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा

Pune Crime News | A case of rape has been filed against the crime branch police ! 5 persons including 2 policemen, woman booked under various sections

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) एका पोलिसावर बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पोलिसासह दुसर्‍या एका पोलिसावर, महिलेवर आणि 2 अनोळखी व्यक्तींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 24 वर्षीय पिडीतेने तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

 

पोलिस अंमलदार कादीर कलंदर शेख (Police Qadir Qalandar Shaikh) आणि पोलिस अंमलदार समीर पटेल (Police Sameer Patel), 2 अनोळखी व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरूध्द भादंवि कलम 420, 376,392, 323, 504, 506, 34 तसेच अनुसूचित जाती/जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम सन 1989 चे कलम 3(1)(12) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बी.टी. कवडे रोडवरील श्रीनाथ कॉम्प्लेक्स आणि आंबेडकर चौकातील डायमंड क्वीन हॉटेल समोर घडली आहे. सुमारे 3 वर्षापुर्वीपासुन ते दि. 1 जुलै 2023 दरम्यान हा गुन्हा घडला आहे (Rape Case). सदरील गुन्हा लष्कर पोलिस स्टेशन (Lashkar Police Station) येथुन सीसीटीएनएस प्रणातीत प्राप्त झाल्याने मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Mundhwa Police Station) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिला या अनुसूचित जातीतील आहेत. त्याबाबत आरोपी कादीर कलंदर शेखला माहित असताना देखील त्याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांच्याशी शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले. वेळावेळी आळंदी येथे जावून लग्न करण्याचे बहाणे केले. प्रत्येक वेळी काही ना काही कारण देवून लग्न करण्यास टाळाटाळ केली.

लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर कादीर कलंदर शेखने पिडीत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. दि. 1 जून 2023 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान आंबेडकर चौकातील हॉटेल डायमंड क्वीन येथे आरोपी कादीर शेख, समीर पटेल आणि इतरांनी पिडीत महिलेला मारहाण केली. कादीर शेखने त्यांचा मोबाईल हिसकावून नेला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास हडपसर विभागाच्या (ACP Hadapsar Division) सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | A case of rape has been filed against the crime branch police ! 5 persons including 2 policemen, woman booked under various sections