पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रमाच्या (Osho Commune) गेटवर बेकायदेशीररित्या जमाव जमवुन आश्रमाच्या मॅनेजमेंटच्या विरोधात घोषणाबाजी करून आश्रमात एन्ट्री करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 130 अनुयायांच्या (Osho Followers) विरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्याविरूध्द दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ओशो आश्रमाच्यावतीने धनेशकुमार रामकुमार जोशी उर्फ स्वामी ध्यानेश भारती (65, रा. बंगला नं. 17, ओशो आश्रम ग नं. 1, कोरेगाव पार्क, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद त्रिपाठी उर्फ प्रेम पारस, सुनिल मिरपुरी उर्फ स्वामी चैतन्य किर्ती, गोपाल दत्त भारती उर्फ स्वामी गोपाल भारती, राजेध वाधवा उर्फ स्वामी ध्यान अनुग्रह, किशोर लाभशंकर रावल उर्फ स्वामी प्रेम अनादी, जगदीश शर्मा उर्फ स्वामी अमन विस्मय, आरी राजदान उर्फ कुनिका भट्टी, न्यु इंडिया न्युजचा प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांच्यासह इतर 100 ते 120 अनुयायांविरूध्द भादंवि 143, 147, 452, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिस नाईक गोकुळ कन्हैयालाल परदेशी (50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरूण विनीत रावल (27, रा. भिलाई वेस्ट, दुर्ग, छत्तीसगड) याच्याविरूध्द भादंवि 353, 332, 504 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, ओशो आश्रमाचे मॅनेजमेंट आणि अनुयायांच्यात मोठे वाद सुरू आहेत.
दि. 22 मार्च रोजी ओशो आश्रमाच्या गेटसमोर मोठया प्रमाणावर अनुयायी जमले होते.
त्यावेळी त्यांनी मोठ-मोठयाने घोषणाबाजी केली तसेच बेकायदा आश्रमात एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला.
ट्रस्टच्या सदस्य साधना (80) यांना धक्काबुक्की झाली तर न्यू इंडिया न्यूजचे प्रतिनिधी वैभवकुमार पाठक
(Vaibhavkumar Pathak) यांनी पत्रकार असल्याचे सांगत आश्रमात एन्टी करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी अनुयायांनी जोशी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोपी करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वरूण विनती रावलने घोषणाबाजी करत धनेशकुमार जोशी यांच्याशी वाद घोतला. त्यावेळी पोलिसांनी
(Pune Police) त्यास समजावुन सांगितले. त्यानंतर देखील रावलने वाद घालून पोलिसांना धक्काबुक्की केली.
प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | A case has been filed in Koregaon Park Police Station against as many as 130 followers who created chaos in the area of Osho Commune Ashram in Pune.
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | अखेर मुहुर्त ठरला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार