Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशन, एस टी बसस्थानक, ससून रुग्णालय परिसरातून चोरीला गेलेले 5 लाखांचे 51 मोबाईल हस्तगत; बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

पुणे : Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station), एस टी बसस्थानक (Pune Station ST Stand), जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office), ससून रुग्णालय (Sassoon Hospital) अशा नेहमीच गजबजलेल्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीला जातात (Mobile Theft Cases). अशा चोरीला गेलेल्या परंतु, लॉस्ट अँड फाऊंड या पुणे पोलिसांच्या (Lost & Found, Pune City Police) वेबसाईटवर गहाळ म्हणून नोंदविलेल्या पैकी ५ लाख रुपयांचे ५१ मोबाईल परत मिळविण्यात बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) यश आले आहे.

केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे हरविलेल्या, चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळविण्याकरीता सीईआयआर चे (Central Equitpement Indentity Register) ऑनलाईन वेबसाईटवर तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार (IPS Amitesh Kumar) यांनी चौकशीचा आदेश दिला होता. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ, पोलीस नाईक विष्णु सरवदे, पोलीस अंमलदार सागर घोरपडे व निलेश पालवे यांनी लोकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन यांचे आयएमईआय नंबर वरुन त्यांचे एसडीआर तसेच लोकेशन याच्याद्वारे शोध घेतला. त्यातून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी आतापर्यंत सुमारे ५ लाख रुपयांचे ५१ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम (ACP Deepak Nikam), बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड (Sr PI Ravindra Gaikwad), गुन्हे निरीक्षक संपतराव राऊत (PI Sampatrao Raut) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ, पोलीस अंमलदार विष्णु सरवदे, सागर घोरपडे, निलेश पालवे, शशांक खाडे, प्रसाद पवार, ज्ञानेश्वर गायकवाड, विशाल जाधव यांनी केली आहे.