पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यातील रस्त्यावर फुगे विक्री करणारी तीन लहान मुले बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार जंगली महाराज रोडवर (Jangli Maharaj Road) घडला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात अपहरणाचा (Kidnapping) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) गुरुवारी (दि.2) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जनाबाई शंकर काळे (वय-10), दत्तु शंकर काळे (वय-7), आरती शंकर काळे (वय-5) अशी बेपत्ता झालेल्या लहान मुलांची नावे आहे. याबाबत मुलांची आई आयना शंकर काळे (वय-35 रा. फुटपाथ, जंगली महाराज रोड, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) शुक्रवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 363 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन मुलांचा शोध सुरु केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना तीन मुले आहेत.
फुटपाथवर राहून फुगे विक्री करण्याचा व्यवसाय त्या करतात.
दोन दिवसांपूर्वी त्या मुलांवर ओरडल्याची प्राथमिक माहिती आहे. आई रागावल्याने मुले कुठेतरी निघून गेल्याची शक्यता आहे. पोलीस फिर्यादी यांच्या नातेवाईकांकडे मुलांबाबत चौकशी करत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव (PSI Sandeep Jadhav) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | 3 children rescued from Jungli Maharaj street; A case of kidnapping has been registered
हे देखील वाचा :
BCCI | बीसीसीआय लवकरच करणार मोठी घोषणा; ‘या’ खेळाडूंना लागेल लॉटरी तर ‘हे’ खेळाडू होऊ शकतात बाहेर