Pune Crime | उत्तमनगर परिसरात नवविवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या

Mumbai Crime News | woman suffering from cancer took an extreme step in mumbai

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | सासरी होणार्‍या छळाला कंटाळून नवविवाहितेने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police) पती व सासुवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

सुशांत वाघमारे (Sushant Waghmare) आणि प्रमिला वाघमारे Pramila Waghmare (रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माधुरी सुशांत वाघमारे Madhuri Sushant Waghmare (वय २३) असे आत्महत्या (Suicide In Pune) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी आनंदा लक्ष्मण कांबळे Ananda Laxman Kamble (वय ४७, रा. निवृत्ती हाईट, उत्तमनगर)
यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२४/२२) दिली आहे.
हा प्रकार १० एप्रिल ते २ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी माधुरी हिचा सुशांत याच्याबरोबर १० एप्रिल रोजी विवाह (Marriage) झाला होता.
लग्नानंतर सुशांत याने वारंवार दारु पिऊन येऊन तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असे.
सासूने घरातील स्वयंपाक येत नाही. वारंवार माहेरी जायचे नाही, असे म्हणून तिचा मानसिक छळ केला.
या छळाला कंटाळून माधुरी हिने २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक लुगडे (Sub-Inspector of Police Lugde) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Newlywed commits suicide by jumping from terrace in uttam nagar area; A case has been filed against the husband mother-in-law for abetting suicide

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी मुंबई कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 78 जणांवर कारवाई

Pune Chandni Chowk | 1 व 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी रस्ते

Satvik Drinks For Navratri | उपवासामुळे डाऊन होत असेल एनर्जी तर ट्राय करा ‘हे’ 5 ड्रिंक्स; दिवसभर रहाल अ‍ॅक्टिव्ह

Kolhapur ACB Trap | भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागणाऱ्या लिपिकावर एसीबीकडून FIR