पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka) अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याचा (Newly Married Couple) हृदयद्रावक अंत झाला. पाण्यात बुडणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा देखील मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना (Pune Crime) जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कुकडेश्वर (Kukdeswar) येथे घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नाजूका दिवटे (Najuka Divate आणि सागर बाळू दिवटे (Sagar Balu Divate) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. नाजूक घराजवळ असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुत असताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत (Drown-in-Well) पडली. पत्नी पाण्यात पडल्याचे पाहून पती सागर याने पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. परंतु सागर यांना पत्नीला वाचवता आले नाही आणि या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. (Pune Crime)
नाजूका आणि सागर यांचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. घटनेनंतर काही वेळाने विहिरीच्या काठावर गाणी
सुरु असलेला मोबाईल दिसला. तर विहिरीच्या पाण्यात बादली तरंगताना दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
सहा महिन्याच्या संसाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Pune Crime | newly married couple drown in well in junnar pune district
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, निगडी परिसरातील धक्कादायक घटना
Rahul Gandhi | ‘मी हँडसम दिसतो का?’ राहुल गांधींच्या प्रश्नावर सोनिया गांधींनी दिले ‘हे’ उत्तर