पुणे : ऑनलाइन – pune crime | पुणे-सोलापूर महामार्गावरील (pune-solapur highway) हॉटेल गारवाचे (hotel garva) मालक रामदास आखाडे (ramdas akhade) यांचा उपचारा सुरू असताना पहाटे मृत्यू झाला. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याप्रकरणी खुनाच्या गुन्हाचे कलम वाढवण्यात येणार आहे, लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) सांगितले.
रामदास आखाडे (वय 38) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा दाखल आहे.
रविवारी रात्री रामदास हे त्यांच्या हॉटेल गारवा (hotel garva) समोर खुर्चीवर बसले होते. ते फोनवर बोलत असताना पायी चालत त्यांच्याजवळ असलेल्या अज्ञात तरुणाने त्यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले होते. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उरळी कांचन परिसरात (uruli kanchan) हॉटेल गारवा (hotel garva) प्रसिद्ध आहे.
दरम्यान याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून,
त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (senior police inspector rajendra mokashi) यांनी सांगितले आहे.
हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
त्यात मारणारा तरुण पायी चालत आला आणि त्याने सपासप वार केला.
त्यानंतर तो तेथून पळाला व दुचाकी घेऊन थांबलेल्या साथीदारासोबत पसार झाला असल्याचे दिसत आहे.
Web Title :- pune crime | murderous attack on ramdas akhade owner of garva hotel in uruli kanchan on pune solapur highway akhade died during treatment
Gang Rape | धक्कादायक ! भुसावळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला
Pune Crime | चाकण एमआयडीसीमधील ATM चा भीषण स्फोट; पहाटेच्या सुमारास घडला प्रकार