पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | उरुळी कांचन(Uruli Kanchan)मधील प्रसिद्ध ‘गारवा हॉटेल’चे (uruli kanchan garva hotel) मालक रामदास आखाडे यांच्यावर अचानक एका तरुणाने येऊन कोयत्याने सपासप वार केले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. अद्याप तरी हल्लेखोराचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे जीवेघेणा हल्ला का झाला आणि कोणी केला, याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. याघटनेने पुण्यातील (Pune News) लोणी काळभोर (loni kalbhor) भागात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री पावणे नऊ वाजता ही घटना घडली आहे.
https://www.facebook.com/
रामदास रघुनाथ आखाडे (वय 38) असे गंभीर जखमी झालेल्या गारवा हॉटेल मालकाचे नाव आहे (Ramdas Raghunath Akhade owner of hotel garva in uruli kanchan). याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) संतोष आखाडे (वय 47) यांनी तक्रार दिली आहे.
oin our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरात महामार्गावर गारवा हॉटेल (uruli kanchan garva hotel) आहे. व्हेज नॉनव्हेज असलेले प्रसिद्ध हॉटेल आहे. या दरम्यान काल (रविवार) साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलच्या बाहेर खुर्चीवर बसले होते. फोनवर बोलत असतानाच अचानक एक मुलगा चालत त्यांच्याजवळ आला. त्याने जवळ येताच शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि त्यांच्या डोक्यात सपासप वार केले. रामदास हे खाली कोसळले. त्यावेळी तो तेथून पसार झाला आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले रामदास हे बेशुद्ध झाले होते त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
पण, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर हल्ला कोणी आणि का केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.
या घटनेने मात्र येथे चांगलीच खळबळ उडाली आहे.
अधिक तपास लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) करत आहेत.
Web Title : Pune Crime | Murderous attack on Ramdas Akhade, owner of Garva Hotel in Uruli Kanchan (CCTV video)
Madha Police | माढा पोलीस स्टेशनच्या सबजेलमधून 4 आरोपींचे पलायन
Mumbai Police | कडक सॅल्यूट ! भर पावसात जखमी बापलेकीला मुंबई पोलिसानं सुरक्षित स्थळी हलवलं
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’ वर पाणीच पाणी; पेणमध्ये गणेशमूर्ती पाण्यात?