Pune Crime | पुण्यात व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचा सपासप वार करुन खून; आंबेगाव बुुद्रुकमध्ये मध्यरात्री घडलेला प्रकार

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कर्जाऊ दिलेल्या पैशाचे व्याज न दिल्याने झालेल्या वादातून दोघांनी एका तरुणावर सपासप वार करुन त्याचा खून (Murder) केला. हा प्रकार कात्रज सिंहगड रोड (Sinhagad Road) दरम्यानच्या नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर रात्री साडेअकरा वाजता (Pune Crime) घडला.
शरद शिवाजी आवारे (वय ४३, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र प्रशांत महादेव कदम (वय ३७, रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यावरुन पोलिसांनी प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे यांनी प्रकाश शिंदे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.
–
त्याचे व्याज शरद दर महिन्याला देत होता. मात्र, या महिन्यात त्याने व्याज दिले नाही. त्यामुळे प्रकाश शिंदे याने शरद आवारे याला कात्रज रोडवरील चंद्रसखा वेअरहाऊसजवळ बोलावले होते. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
तेव्हा चिडलेल्या प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदाराने धारदार हत्याराने शरद याच्यावर सपासप वार केले व ते पळून गेले.जखमी अवस्थेत शरद याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area
Kirit Somaiya | आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले…
Pune Cyber Crime | 18 बँकांमधील 41 खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा
Truecaller Call Recording | ‘Truecaller’ मध्ये आता काॅल रेकाॅर्डिंग करता येणार; जाणून घ्या
Comments are closed.