पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) कॅनॉल रोडजवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून (Murder) करण्याचा प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.
योगेश अंकुश भोकरे Yogesh Ankush Bhokare (वय ३८, रा. गल्ली नं. २३, जनता वसाहत) असे खून (Pune Crime) झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना सिंहगड रोडवरील रामकृष्ण मठाच्या मागील बाजूला कॅनॉल रोडजवळ मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी आदिती योगेश भोकरे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश भोकरे हे टेलर म्हणून काम करत होते.
काल सायंकाळी ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह कॅनॉल रोडला पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी जाऊन पाहिले असता भोकरे यांच्या डोक्यात, चेहर्यावर दगड घालून त्यांचा खून केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.
web title: Pune crime murder of yogesh ankush bhokare in dattawadi police station area near sinhagad road.