पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | शिविगाळ केली म्हणून चक्क मुलाने जन्मदात्या पित्याचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी आई, मुलगा आणि इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून (Pune Crime) मुलाने वडिलांना धक्काबुक्की करत कठड्यावर ढकलून देत त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी (28 ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सुमारास मावळ तालुक्यातील (Maval taluka) चंदनवाडी-चांदखेड येथे घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, राजू शंकर पारधे (Raju Shankar Pardhe) (वय, 53 रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. मुलगा गणेश राजू पारधे (Ganesh Raju Pardhe) (वय, 28 या मुलाला पोलिसांनी (Pune Crime) ताब्यात घेतलं आहे. मृत राजू पारधे हे आरोपीचे वडील होते. त्यांनी त्यांची पत्नी मंजुळाबाई, मुलगा गणेश आणि घरातील इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून गणेशने वडील राजू यांना धक्काबुक्की केली. तसेच घरासमोरील दगडी कठड्यावर ढकलून दिले. राजू पारधे दगडी कठड्यावर जोरात आपटले. त्यातच त्यांचा मृत्यू (Died) झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करून पोलिसांनी गणेश याला अटक (Arrested) केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस (Police ) तपास करीत आहेत.
web title: pune crime murder of father by son incidents in maval taluka of pune.
Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज प्रकरणानं NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ?