Pune Crime | कोंढव्यात युवकावर कोयत्याने सपासप वार करुन खुन; उपचारादरम्यान झाला मृत्यू

pune crime murder of 17 years old youth in kondhwa police station area

पुणे :बहुजननामा ऑनलाईन  – Pune Crime | पूर्ववैमनस्यातून 17 वर्षाच्या युवकावर चार ते पाच जणांनी कोयत्याने सपासप वार करुन त्याचा खुन (Murder) करण्यात आला. कार्तिक जाधव (वय 17) असे खुन (Pune Crime) झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अनिल पांढरे (वय 22), साहिल आडके (वय 18), अभी पवार (वय 19) आणि त्यांचे दोन साथीदार (सर्व रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी प्रल्हाद अनिल जाधव (वय १९, रा. येवलेवाडी) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना येवलेवाडी रोडवरील स्टार हॉटेल स्रॅक्स सेंटरचे समोरील कट्यावर गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता घडला होता.

कार्तिक जाधव व आरोपीची यापूर्वी भांडणे झाली होती. कार्तिक जाधव हा कट्यावर बसला
असताना या भांडणाचा राग मनान भरुन आरोपींनी कोयत्याने डोक्यात, हातावर, कानावर वार करुन
गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी कार्तिकला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी अगोदर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. कार्तिकचा मृत्यु झाल्यानंतर त्यात खुनाचे ३०२ कलम वाढविण्यात आले आहे.

web title: pune crime murder of 17 years old youth in kondhwa police station area.

Pune Crime | बायकोच्या ‘मारा’ला घाबरुन पळणार्‍या नवर्‍याची लोकांकडून ‘चोर’ समजून ‘धुलाई’ !

Latur Crime | वृद्ध बहिणींचा खुन करुन मृतदेह पुरल्यावर त्यावर गायीला मारुन टाकले; पुरावा नष्ट करण्यासाठी जावयाने केले कृत्य

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पोलिस दलात महिला कर्मचार्‍यांची संख्या 10.30 टक्क्यांवरून वाढवून 33 % करण्याचे निर्देश

Solapur News | दुर्दैवी | व्यायामाला जातो सांगून घराबाहेर पडले, शेततळ्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू