पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव जाणार्या पीएमपी बसची (PMP Bus) समोरुन येणार्या मोटारसायकलला धडक बसल्याने झालेल्या अपघातात (Accident) मोटारसायकलस्वाराचा मृत्यु (Death) झाला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शंकर बबन काळे Shankar Baban Kale (वय ३१, रा. जांभळी, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यु पावलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. हा अपघात (Pune Accident News) आगळंबे गावाकडून कोंढवे धावडे गावाकडे जाणार्या रोडवर कमळादेवी मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडला.
याबाबत पोलीस अंमलदार गजानन चव्हाण (Police Constable Gajanan Chavan) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पीएमपी बसचालक कमलाकर पांडुरंग शेवाळे (Kamalakar Pandurang Shewale) (वय २९, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर काळे हे मोटारसायकलवरुन एन डी ए रोडने (NDA Road) कुडजे गावाच्या दिशेने जात होते.
त्याचवेळी आगळंबे गावाकडून कोंढवे धावडे गावाकडे पीएमपी बस येत होती.
कमळादेवी मंदिराजवळ बसचालकाने समोरुन येत असलेल्या मोटारसायकलला जोरात धडक दिली.
त्यात शंकर काळे हे गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यु झाला. उत्तमनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Motorcyclist dies in collision with PMP bus
हे देखील वाचा :
Rain in Maharashtra | मुंबई, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पुढील 8 दिवस ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट