पुणे : बहुजननामा ऑनलाईन – अनैतिक संबंधातून झालेल्या बाळामुळे होणारी बदनामी टाळण्यासठी जन्मदात्या आईने एका दिवसाच्या बाळाला ओढ्यात फेकल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) आंबील ओढ्यात (ambil odha) उघडकीस आली असून बाळाला टाकणाऱ्या महिलेवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार (PSI Swapnil Lohar) सहकऱ्यांसोबत हद्दीत गस्त घालत होते.
गस्त घालत असताना दांडेकर पूल (dandekar bridge) आंबिल ओढा या नागरिकांची गर्दी झाल्याची माहिती मिळाली.
आंबिल ओढ्याच्या कडेला असलेल्या चिखलात एक नवजात जिवंत बालक (मुलगा) सापडल्याने परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बाळाला ताब्यात घेऊन तातडीने उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले.
दरम्यान पोलिसांनी यासंदर्भात पोलिसांनी परिसरात तपास केला. तपासादरम्यान नागरिकांकडून माहिती मिळाली की अनैतिक संबंधातून एका महिलेने या बाळाला बदनामी टाळण्यासाठी बलकाला फेकून दिले आहे. याप्रकरणी आरती निखील बोडके (वय-29 रा. दांडेकर पुल, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Crime | mother threw baby stream shocking incident pune baby safe
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खुशखबर ! ESIC मध्ये आता येतील 30 हजार रुपये पगार घेणारे कर्मचारी, जाणून घ्या काय आहे योजना?
BJP leader Prasad Lad | ‘नारायण राणेंच्या जीवाला धोका – प्रसाद लाड