पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कुटुंबातील लोकांसोबत रात्री दोन पर्यंत गप्पा मारल्यानंतर मायलेकींनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची (commits suicide) धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील रहाटणी येथे घडली आहे. मायलेकींनी राहत्या घरात गळफास (hanging) घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रहाटणी येथील सज्जनगड कॉलनीत उघडकीस आला आहे. याप्रकरणाची वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) नोंद करण्यात आली आहे.
सुनिता युवराज नवले Sunita Yuvraj Navale (वय-26) आणि श्रावणी युवराज नवले Shravani Navale (वय-13 रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी) असे आत्महत्या (Pune Crime) केलेल्या मायलेकींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनीता यांचे पती युवराज नवले हे रात्री दोनच्या सुमारास घरी आले. त्यावेळी घरातील सर्वांनी गप्पा मारल्या. त्यानंतर सर्वजण घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले. दरम्यान, सुनीता आणि मुलगी श्रावणी यांनी बेडरुममध्ये जाऊन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सकाळी मुलगा स्वराज Swaraj Navale (वय-10) हा लघुशंकेसाठी उठला. त्याने आईला आवाज देत बेडरुमचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याने टेरेसवर झोपलेल्या वडिलांना बोलावून आणले. त्यानंतर त्यांनी बेडचा दरवाजा तोडल्यानं सुनीता आणि श्रावणी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर मयत सुनीताच्या नातेवाईकांनी पती युवराज नवले याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. युवराज याचे एका महिलेशी अनैतिक संबंध (Immoral relations) होते.
त्यामुळेच सुनीता यांनी आत्महत्या केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime| Mother daughter duo hang themselves to death in Rahatani of pimpri chinchwad pune district
Pune Crime | आळंदीत वारकरी संप्रादायीतील तरुणाची आत्महत्या
Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन लिपीक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात