पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पैशांच्या बदल्यात दुप्पट रक्कम दिली तरीही अधिक रक्कमेची मागणी करुन जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) देणाऱ्या बेकायदा सावकारी (Illegal Moneylenders) करणार्याला पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बिलाल इसाक शेख Bilal Isaak Shaikh (वय २६, रा. डॉल्फीन चौक, बिबवेवाडी) असे अटक (Arrest) केलेल्या या सावकाराचे नाव आहे. त्याचे साथीदार शेहनाझ शेख व अनोळखी महिला, पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी येथील एका ४० वर्षाच्या नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२९/२२) दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्याच्या मुलाचे शाळेची फी भरायची होती.
त्यासाठी त्यांनी महिन्याला ३० टक्के व्याजाने बिलाल शेख याच्याकडून २९ हजार ५०० रुपये गेल्या वर्षी नोव्हेबर २०२१ ला घेतले होते.
जानेवारी २२ पर्यंत त्यांनी त्या बदल्यात ५३ हजार ९९० रुपये दिले.
तरीही बिलाल शेख हा अजून १ लाख २० हजार रुपयांची मागणी करीत होता.
त्याच्या वसुलीकरीता तो इतर दोघांना घेऊन फिर्यादी यांच्या घरीही आला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी यांना “तू बिलाल शेख याचे पैसे दिले नाही तर तुला उचलून घेऊन जाऊन कुठे मारुन टाकू कळू देणार नाही,”
अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर शेख याने फिर्यादी यांना डॉल्फीन चौकात बोलावून जबरदस्तीने ४० हजार
रुपयांचा चेक घेऊन बाकी पैसे नाही दिले तर शेख याचा भाऊ जेलमधून सुटल्यावर उचलून गायब करण्याची धमकी दिली.
त्यामुळे शेवटी घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसाकडे धाव घेत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक खंडाळे (Sub-Inspector of Police Khandale) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Moneylender arrested for threatening to kill for double recovery of money taken to pay child’s school fees; 30 percent interest was charged per month
हे देखील वाचा :
Pune Crime : फरार सराईत गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुळशीतून अटक